Pune Crime : बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या वडिलाचा निर्घुण खून, पुण्यातील धक्कादायक घटना..


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दररोजन अनेक घटना समोर येत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीचा कोयत्याने वार करत अतिशय निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. मुलाने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून त्याच्या वडिलांचा खून केला केल्याने खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना येरवडा येथील राजीव गांधीनगर घडली आहे.

कटाळू कचरू लहाडे ( वय. ५५) असे कोयत्याने वार करून खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकणी आरोपी इस्माईल रियाज शेख (वय.२५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सविस्तर माहिती अशी की कटाळू कचरू लहाडे यांना आरोपी इस्माईल रियाज शेखने धारदार शस्त्राने तोंडावर वार करून मारले. आरोपीच्या बहिणीस मयताच्या मुलाने पळवल्याने हा खून केला असल्याचे सांगितले जात आहे. मयताचा मृतदेह पोस्टमार्टम करता पाठवून देण्यात आलेला आहे. Pune Crime

तसेच आरोपी इस्माईल रियाज शेख पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनास्थळी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!