Politics : महायुतीच ठरलं! मुख्यमंत्रीपदाचा चेहेरा कोण? दिल्लीत काय निर्णय झाला? महत्वाची माहिती आली समोर…

Politics : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळाले आहे.
महायुतीला राज्यात अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा ३१ जागांवर विजय झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
लोकसभा निवडणुकीत भाजप कमी जागा मिळाल्यानंतर त्या पराभवाची जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, पक्ष नेतृत्वाने त्यांना हिरवा कंदील न देता उपमुख्यमंत्रीपदावर काम सुरू ठेवण्यास सांगितले होते. यानंतर दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासोबत महाराष्ट्र भाजपच्या नेत्याची बैठक झाली.
दिल्लीत राष्ट्रीय नेतृत्वासोबत महाराष्ट्र भाजप नेत्यांच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जात होते.
मात्र, लोकसभेच्या अवघ्या ९ जागा जिंकल्यामुळे केंद्रीय नेतृत्व पक्षाच्या कामगिरीवर खूश नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय लढवण्याची रणनीती पक्षाच्या हायकमांडने आखली आहे.
महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षनेतृत्व आणि मित्रपक्ष मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील असे म्हटले आहे. मात्र, असे असले तरी भाजप मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढवणार आहे.
दरम्यान, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मुंबई उत्तर लोकसभेतून विजयी झालेले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पक्षाने ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य नेतृत्वात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती दिली होती.
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसपेक्षा भाजप मागे पडला. विधानसभेत भाजपचे १०० पेक्षा जास्त आमदार आहेत. पण, लोकसभेत भाजपचे 9 तर काँग्रेसचे १३ खासदार आहेत. अपक्ष विशाल पाटील यांच्यामुळे काँग्रेसची संख्या १४ वर पोहोचली आहे. अशा परीस्थितीत फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता फारच कमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.