School Holidays : यावर्षी शाळांना 124 दिवस सुट्टी, सार्वजनिक 76, दिवाळीत 12 तर उन्हाळ्यात 43 दिवस असणार सुट्टी, जाणून घ्या…


 School Holidays : यंदाच्या शैक्षणिक वर्षातील सार्वजनिक सुट्यांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. २०२४-२५ मध्ये सार्वजनिक सुट्या ७६ दिवसांच्या तर वर्षातील रविवार, असे मिळून यंदा १२४ दिवस शाळा बंद राहणार आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या १२ दिवसांची असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ सकाळी साडेदहा ते पाच वाजेपर्यंत भरतील. अर्ध्या दिवसाच्या शाळेची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असणार आहे. रमझान उपवासानिमित्त उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत भरतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केले आहे.

शाळेच्या कामकाज दिवशी ६० मिनिटांची मोठी सुटी तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात दहा मिनिटांच्या दोन लहान सुट्या असतील. प्राथमिक शाळा सतत तीन दिवस बंद राहणार नाहीत, याची दक्षता मुख्याध्यापकांनी (गावची यात्रा असा अपवाद वगळता) घ्यायची आहे. School Holidays

यादीतील सुट्या सोडून इतर दिवशी थोर महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी असल्यास त्या दिवशी शाळा भरवून विविध स्पर्धाचे आयोजन करावे. २६ नोव्हेंबर रोजी शाळेत संविधान दिन साजरा करावा, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुख्याध्यापकाच्या अधिकारात एक सुटी दिली जाते तर गावची स्थानिक यात्रा असेल, त्या दिवशी देखील एक सार्वजनिक सुटी दिली जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील सार्वजनिक सुट्यांमध्ये या दोन सुट्यांचाही समावेश आहे. मुख्याध्यापक अधिकारातील सुटी घेण्यापूर्वी संबंधित मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तीन दिवस अगोदर लेखी कळविणे अपेक्षित आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!