Sharad Pawar : एकच मुलगी असलेल्या बापाला अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात, शरद पवार भर सभेत असं का म्हणाले?

Sharad Pawar : एका मुलीच्या बापाचे जगणे वेगळेच असते, एकच मुलगी असल्याने अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. ते बारामतीमध्ये आयोजित डॉक्टरांच्या कार्यक्रमात सभेला संबोधित करताना बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, सुप्रिया सुळे त्यांच्या मुलांसाठी लंडनला गेल्या आहेत, म्हणून त्या इथे येऊ शकल्या नाहीत. मी मुलीचा बाप म्हणून इथे उपस्थित आहे. इथे एकच मुली असलेले बाप कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला यावर अनेकांचे हात वर येताच इतके असतील तर आपण आपला एक वेगळा ग्रुप करू, असेही पवारांनी म्हंटले आहे. Sharad Pawar
माझी मुलगी इथे हजर नाही, पण बापाचेच कौतुक चाललेले आहे. मला माहित नाही तुमच्यामधे एकच मुलगी असलेले किती जण आहेत. एकच मुलगी ज्या बापाला असते, त्यांचे जीणे एक वेगळेच असते. अनेक गोष्टी त्यांना ऐकाव्याचे लागतात. बारामतीमध्ये आयोजित डॉक्टरांच्या कार्यक्रमात सभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.