Pune : पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, उद्यापासून अर्ज होणार वाटप..

Pune : महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के अनुदानित मोफत पास योजना सुरू करण्यात आली आहे.
पुणे – पीएमपी प्रशासन पुणे महापालिकेच्या शाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के अनुदानित मोफत तर पुणे महापालिका हद्दीतील खासगी शाळेतील इयत्ता ५ वी ते इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांना ७५% अनुदानित मोफत बस प्रवास पास देणार आहे.
उद्यापासून अर्जाचे वाटप…
विद्यार्थ्यांना मोफत पाससाठी १२ जूनपासून अर्जाचे वाटप सर्व आगारांमधून आणि पास केंद्रांवर करण्यात येणार आहे. तसेच भरून दिलेले अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील. संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठीचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रितरीत्या घेऊन जाऊ शकतात. Pune
हे अर्ज भरून आगार एकत्रित जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेला एकत्रित पास दिले जातील, महामंडळाने दिलेले सर्व पास शाळाप्रमुखांनी त्यांच्या शाळेत वितरित करावेत, यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार नाही,’ असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.
प्रस्तुत योजनेसंबंधी सविस्तर माहिती मारामंडळाच्या सर्व आमारामध्ये उपलब्ध आहे. तरी पुणे मनपाचे शाळेतील व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यालयांनी या सततच्या पाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, अशी माहिती देण्यात आली आहे.