दौंडमध्ये संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला विरोध, २५ भीमसैनिकांवर गुन्हा दाखल…!

दौंड : दौंड येथे शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला भीम सैनिकांनी विरोध केला आहे. यामुळे त्यांच्याविरुध्द पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकऱणी २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. भिडे गुरुजी यांच्या कार्यक्रमाला स्थानिक भीमसैनिकांनी विरोध केला होता. त्यानंतर याप्रकरणी भिडे समर्थकांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, आंबेडकरी चळवळीतील पदाधिकार्यांनी दौंड पोलिसांनी केलेली कारवाई ही चुकीची असल्याचा आऱोप केला आहे. याविरोधात भीमसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी या पोलिसांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

या कार्यक्रमाला उपस्थिती न लावता भिडे हे पुढील नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले. यावेळी भिडे समर्थक आणि भीम सैनिक अशा दोन्ही बाजूने दौंड शहरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे शहरात काहीवेळ वातावरणात तणाव देखील निर्माण झाला होता.