नेते राहुल गांधींचा नवा अंदाज चर्चेत..!

लंडन : भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांचा लूक पूर्णपणे बदलला आहे. भारत जोडो यात्रेत असताना राहुल गांधी यांनी दाढी वाढवली होती.यातच आता राहुल गांधींचा नवा लूक समोर आला आहे.

लंडनमधील केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या एका कार्यक्रमात पोहोचण्यापूर्वीही त्यांनी हा लूक ठेवला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये राहुल गांधी लहान केस आणि ट्रिम केलेल्या दाढी आणि मिशांमध्ये दिसत आहेत. राहुल येथे त्याच्या ट्रेडमार्क पांढऱ्या टी-शर्टऐवजी कोट-टायमध्ये दिसले. त्यांचा हा लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.
Views:
[jp_post_view]