Supriya Sule : शरद पवार गटाला मोठा धक्का! सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप करत बड्या महिला नेत्याने सोडला पक्ष…
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गट विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी पक्षाला रामराम ठेवला आहे. यामागे त्यांनी खासदार सुप्रिया सुळे कारण असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ लोक आहेत, जे शरद पवार यांच्यासाठी काहीही करायला तयार आहेत, ते लोक निर्णय घेत आहेत आणि पक्षाला सोडून जात आहेत, शरदचंद्र पवार पक्षाच्या तरुण तडफदार महिला नेत्या सोनिया दुहान यांनी केले आहे.
तसेच नेत्या सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणल्या की, नेत्यांना पक्षातून हटवण्याचं काम सुरू आहे तर सुप्रिया सुळे यांच्या बाजूचे लोक कारस्थान रचत आहेत, असा गंभीर आरोपही सोनिया दुहान यांनी केला.
पुढे त्या असेही म्हणाल्या, मी आजपर्यंत पक्ष सोडला नाही. पण मी खूप लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे. मी दुसरा कोणत्या पक्षात प्रवेश करणार नाही. तुम्हाला वाटेल की, मी उद्या अजित पवार गट, भाजप किंवा काँग्रेस पक्षात जाईन, तर तसं नाही. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी सध्या कोणताच निर्णय घेणार नाही. Supriya Sule
सुप्रिया सुळेंच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे पक्षाचं काम करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचे आणि हटवण्याचे आणि मजबूर करण्याचे काम करत आहेत. पक्ष सोडावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा गंभीर आरोप करत त्यांनी सुळेंवर हल्ला चढवला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.