कुंजीरवाडीच्या महिला सरपंचाला राजीनाम्यासाठी धमकी, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…!

उरुळी कांचन : कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सरपंचाला धमकी देऊन जातिवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी 32 वर्षीय महिला सरपंचाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सरपंचपदाचा राजीनामा दे, नाहीतर कुटुंबासह एका रात्रीत संपवेन. खैरलांजी हत्याकांडाप्रमाणे खून करीन. तपासही लागू देणार नाही, अशी धमकी देण्यात आली आहे.यामुळे यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याबाबत ग्रामपंचायत सदस्यासह तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्राम कोतवाल याने धमकी दिली, तसेच जातिवाचक व अश्लील शिवीगाळ करून लज्जास्पद वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच या सरपंच या गर्भवती आहेत. संग्रामची आई व भाऊ हे सरपंचांच्या अंगावर मारण्यासाठी धावून आले व त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन जातिवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
कुंजीरवाडी ग्रामपंचायतची सभा शनिवारी होती. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या सभागृहात सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.