अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुणाला 20 वर्षे सक्तमजुरी..!!


 

लोणी काळभोर : फिर्यादी व पिडीत मुलगी फितूर होऊनही, अल्पवयीन मुलीला मारुन टाकण्याची धमकी देऊन बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी एका वीस वर्षीय तरुणाला २० वर्षांच्या तीन सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंड जिल्हा व सत्र न्यायाधीश एस बी हेडाऊ यांनी ठोठावला आहे.
 

 

या प्रकरणी सुरज सुभाष  चव्हाण (वय. २०, रा. ता. मुळशी, जि. पुणे), (मुळगाव नागेवाडी, ता. वाई, जि. सातारा) याला हि शिक्षा सुनावली आहे. या संदर्भात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरज चव्हाण याने नोव्हेंबर २०२१ मध्ये सदर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. मार्च २०२२ मध्ये मुलीचे पोट दुखल्याने तिला दवाखान्यात नेले असता ती गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 

 

 

 

या गुन्ह्यात फिर्यादी व पिडीत फितुर असुनही आरोपीस
1) भारतीय दंड विधान ३७६ (३) अन्वये २० वर्षे सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंड, 2) अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण (पोक्सो)  ३, ४ (२)अन्वये २० वर्षे सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंड 3) पोक्सो ५ (l) (N) ६ खाली २० वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड अशा तीन शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत. तीनही शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या आहेत.
 

 

 

 

या गुन्ह्याचा तपास पौड पोलीस ठाण्यातील तत्कालीन उपनिरीक्षक एम एस गायकवाड यांनी केला होता. अतिरिक्त सरकारी वकील म्हणून ए एस कुंभार यांनी काम पाहिले. पौड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी कर्मचारी हवालदार अल्ताफ हवालदार, सत्र न्यायालय पैरवी अंमलदार सहायक फौजदार विद्याधर निचीत, आकाश पवार यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!