Accident News : आज्जी कडेवर नातीला घेऊन बसची वाट बघत होती, अचानक भरधाव वेगाने ट्रक आला अन् क्षणात होत्याच नव्हतं झालं, पुण्यात काळीज सुन्न करणारी घटना…


Accident News : कोल्हापूरला जाण्यासाठी खासगी बसची वाट पाहणाऱ्या आजी आणि नातीला आयशर ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. पुण्यातील भूमकर ब्रीज-नऱ्हे भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या धडकेत दोघींचा मृत्यू झाला आहे.

यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत. पाटील कुटुंबीय शनिवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरला निघाले होते.

त्यावेळी बाह्यवळण मार्गावर पाटील कुटुंबीय खासगी प्रवासी बसची वाट पाहत थांबले होते. शीतल पाटील यांनी नात अबोलीला कडेवर घेतले होते. त्यावेळी भरधाव ट्रकचालकाने शीतल आणि अबोलीला धडक दिली. काही समजायच्या आतच सगळा प्रकार घडला आहे. Accident News

या अपघातात दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच दोघींचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अस्मिता लाड करत आहेत.

या अपघातात शीतल सिद्धराम पाटील (वय-४२) आणि अबोली सूरज शेटके (वय-६) असे मृत्युमुखी पडलेल्या आजी आणि नातीचे नाव आहे. याबाबत रोहन पाटील (१९, रा. नऱ्हे) याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये पांडुरंग सुनील पिनाटे (वय-२८, रा. तुगाव, ता. भालकी, जि. बेळगाव, कर्नाटक) या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!