Baramati : बारामतीला जाणारे पाणी दोन्ही धरणातून बंद! अचानक झाला निर्णय, शेतकरी आक्रमक, नेमकं काय घडलं?


Baramati : राज्यात सध्या भीषण दुष्काळ जाणवू लागला आहे. यामुळे पाण्याचा वाद निर्माण होत आहे. असे असताना आता बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी आता बंद झाले आहे. आधी भाटघर धरणाचे पाणी बंद केले तर आज निरदेवघर धरणाचे पाणी बंद केले.

यामुळे याबाबत शेतकरी तीव्र झाले आहेत. बारामतीला पाणी पुरवणाऱ्या निरदेवघर धरणाचे ही पाणी बंद करण्यात आले. यामुळे आता बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे. भोर तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पाणी बंद करण्यासाठी आक्रमक पवित्र घेतला होता. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

धरणावर अवलंबून असलेल्या हिरड्यास मावळ गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. गावकरी पाणी बंद करण्यासाठी निरा देवघर धरणावर ठिय्या मांडून बसले होते. आजच्या आज पाणी बंद नाही केले तर पाण्यात उड्या मारण्याचा पवित्रा घेतला होता. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. Baramati

पुण्यातील भाटघर धरणात केवळ 11%पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा विसर्ग थांबवल्यामुळे भोर तालुक्यावर पाणीसंकट आलं आहे. पाणी प्रश्न न सोडवल्यास 42 गावांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. तसंच भाटकर धरण प्रकल्पग्रस्तांनीही जलसमाधीचा इशारा दिला. यामुळे प्रशासनाच्या पुढे देखील मोठे पेच निर्माण झाला आहे.

यामुळे आता येणाऱ्या काळात राज्यात अजून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. याबाबत आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!