इंदापूरमध्ये धक्कादायक घटना ! घरात कोणी नसल्याचा अंदाज घेत अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार…!


इंदापूर : इंदापूर जिल्ह्यातील गागरगाव गावाच्या नजिक एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात कोणी नसल्याचा अंदाज घेत अल्पवयीन मुुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी दत्तू नामदेव काळेल ( बिजवडी, ता. इंदापूर,वय ४८) आरोपीवर या संदर्भात पीडितेच्या आईने (ता.२१) रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्या अनुषंगाने आरोपीवर भा.द.वि. ३७६, ३५४ अ आणि ३५४ ब कलमांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील फिर्यादी, पीडितेची आई देवदर्शनाला गेल्या असताना घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने सोमवारी (२० फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारासघरामध्ये प्रवेश केला. घराची कडी आतून लावत आरोपीने १५ वर्षीय मतीमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

याचदरम्यान फिर्यादी देवदर्शनाहून परतल्यानंतर घराची आतून लावलेली कडी उघडत आरोपीने फिर्यादीला धक्का देऊन तेथून पळ काढला. पीडित मुलीने ,आरोपीने आपल्यावर बलात्कार केल्याचे आपल्या आईला सांगितले असता, फिर्यादीने पोलिसात धाव घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!