लंडन मधील ब्रुनेल विद्यापीठात दुमदुमला शिवरायांचा जयजयकार…!


शिरूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा रविवारी जसा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ठिकठिकाणी उत्साहात साजरा झाला तसाच तो यंदा काही युवकांनी परदेशात ही साजरा केला आहे.

लंडन मधील ब्रुनेल विद्यापिठात भारतीय विद्यार्थ्यांनी शिवजयंती साजरी करत ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. परदेशात शिवजयंती साजरी केल्याने संपुर्ण पुणे जिल्ह्यात या विद्यार्थ्यांची चर्चा व कौतूक केले जात आहे.

तळेगाव ढमढेरे ( ता. शिरूर ) येथील ऋतुराज महेश ढमढेरे या विद्यार्थ्याने पूढाकार घेऊन लंडनच्या ब्रुनेल विद्यापिठाच्या आवारात निसर्ग पवार, आदित्य तिठे अभिषेक घावटे यांच्या सहकार्यातून २०० भारतीय व अन्य देशाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा उंचावून या विद्यार्थ्यांनी शिवजयंती साजरी केली.

भारतात छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेले किल्ले व त्यांची प्रेरणादायी भारतीय संस्कृती याचा अभ्यास संपुर्ण जगभर केला जातो. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन म्हणून लंडनमध्ये शिवजयंती साजरी करण्याचे ठरले. त्याला भारतीय व अन्य देशातील २०० विद्यार्थ्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला, असे ऋतुराज महेश ढमढेरे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांचे कार्य संपुर्ण जगभरात होणे गरजेचे आहे. भारता बरोबरच इतर देशात शिवजयंती साजरी होऊ लागल्याने या परदेशातील विद्यार्थ्यांचा सार्थ अभीमान आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!