Pune Crime : सोसायटीच्या पार्कींगमध्ये थांबलेल्या तरुणीला मिठी मारून केला किस, नंतर घडली धक्कादायक घटना, कोंढवा परिसरातील घटना…

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सोसायटीच्या पार्कींगमध्ये थांबलेल्या तरुणीला मिठी मारुन तिचा कीस घेऊन अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी ५८ वर्षाच्या व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार बुधवारी (ता.२७) दुपारी साडेतीन आणि गुरुवारी (ता.८) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडला आहे. घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकणी कोंढवा खुर्द येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने शुक्रवारी (ता.२९) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुरविंदसिंग चव्हाण (अंदाजे वय ५८ पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime
मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुणी सोसायटीच्या पार्किंग मध्ये थांबली होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला. त्याने मुलीला मिठी मारुन कीस केला.
तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डागोळे करीत आहेत.