Pune Crime : ‘त्या’ तरुणीसाठी दोन तरुण रक्तबंबाळ! कोयत्याने केले वार, पुण्यात धक्कादायक प्रकार….

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या आता देखील अशीच एक थरारक घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्य आणि अनैतिकसंबंधाच्या संशावरून दोन व्यक्तींनी एकमेकांवर थेट कोयत्याने वार केलेत. पुण्यातील चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागात एका तरुणाने दुसऱ्यावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केल्याची घटना समोर आली आहे. Pune Crime
शंकर मिरेकर आणि किशोर धोत्रे अशी जखमी तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, पूर्ववैमनस्य आणि एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले आहेत, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून ही माहिती मिळाली आहे. मिरेकर आणि धोत्रे हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत.

मिरेकरला धोत्रेवर राग होता आणि त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने मिरेकरसा रस्त्यात गाठलं आणि त्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर धोत्रेने सुद्धा त्याच्या साथीदारांना बोलवून मिरेकरवर हल्ला चढवला. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांकडून तपास आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, झालेल्या झटापटीत दोघेही रक्तबंबाळ झालेत. पुण्यात भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्याने जाताना कधी काय होईल आणि काय नाही याचा काहीच नेम नाही, अशा घटनांमुळे सामान्य नागरिक भीती व्यक्त करत आहेत.