Pune Crime : धक्कादायक! नमाज पठणासाठी आलेल्या तरुणावर कोयता हल्ला, येरवडा येथील घटना…

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा येथे कामगार नगरमध्ये बजरे मज्जित येथे नमाज पठण करण्याकरिता एक जण आला होता. त्यावेळी त्याच्यावर कोयता हल्ला करण्यात आला.

पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे समजत आहे. दोन गटात भांडण होते एक जण कोयत्याने मारहाण करिता त्याच्या अंगावर धावून गेला होता तो मज्जिदमध्ये पळ घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला. Pune Crime


आरोपी त्या ठिकाणी फिरत होते. सीसीटीव्ही फुटेटमध्ये पाच सहा जणांच्या हातामध्ये कोयता दिसत आहे. पोलीस CCTV च्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.