MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात, रात्री अकरा वाजता विद्यार्थ्यांना दिला शब्द…!

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एमपीएससी परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या घोषणा दिल्या.

या आंदोलनाची दखल स्वत: शरद पवार यांनी घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. रात्री अकरा वाजता शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांसाठी चर्चा केली. तसेच त्यांना यामध्ये आपण लक्ष घालणार असल्याचा शब्द देखील दिला आहे.
ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आयोगाने काही बदल केलेला आहे, असं पत्र मला काल मिळालं. हे पत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सी. जी. पाटील यांनी लिहिलं आहे. या पत्रात विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत.

त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आपण स्वत: उपस्थित राहून मार्ग काढावं, असं पत्रात म्हटलं आहे, यामुळे मी स्वतः बैठकीला उपस्थित राहील असेही पवार यांनी म्हटले आहे.