नायगावचे सरपंच जितेंद्र चौधरी यांना नारायणगाव रोटरी क्लबचा राष्ट्रबांधणी शिल्पकार पुरस्कार…!

नारायणगाव : रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या वतीने राष्ट्रबांधणीचे शिल्पकार म्हणून पुणे जिल्ह्यातील ४० व्यक्तींचा सन्मान करण्यात आला, सामाजिक योगदान दिलेल्या कर्तबगार व्यक्तिंचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला असून नायगाव (ता.हवेली ) येथील सरपंच जितेंद्र चौधरी यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

शेती, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रांतील कार्यक्षम व प्रयोगशील व्यक्तींचा रोटरी क्लबच्या वतीने सन्मान करण्यात आला.


यावेळी वारूळवाडीचे सरपंच राजेश मेहेर व उपसरपंच ज्योती संते, डॉ. पंजाबराव कथे, अॅड. राम भालेराव, नारायणगावचे सरपंच योगेश (बाबू) पाटे, रामभाऊ सातपुते, रवींद्र वाजगे, अंबादास वामन, गणेश गोडसे आदी उपस्थित होते. रोटरी क्लब नारायणगाव हायवे व त्यांच्या सर्व सदस्यांनी ग्रामपंचायत वारूळवाडी व नारायणगाव अंतर्गत विविध उपक्रम राबविले. त्याचा निश्चितच फायदा होत आहे, असे मत ग्रामपंचायत वारूळवाडी गावचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी व्यक्त केले.
नारायणगाव रोटरी क्लब हायवेचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर, उपाध्यक्ष रवींद्र वाजगे, आयपीपी प्रो.डॉ. शिवाजी टाकळकर, सेक्रेटरी नंदकुमार चिंचकर, खजिनदार नारायण आरोटे, रामभाऊ सातपुते, अंबादास वामन, बाळासाहेब गिलबिले, गणेश गोडसे, श्यामराव थोरात, सुकाजी मुळे, धनाजी बोरकर, नितीन भुजबळ, ओंकार मेहेर, अॅडव्होकेट अरुण गाडेकर, वैशाली फुलसुंदर, मनीषा मुळे, अश्विनी थोरात, डॉ. मधुरा काळभोर, उर्मिला वाजगे, नीलिमा भुजबळ, बायजाबाई सातपुते यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
