कसब्यात पवारांच्या रॅलीत एकनाथ शिंदे यांचे गाणे; वैतागलेले अजित दादा गाडीतून उतरले आणि….


पुणे : पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. याशिवाय राज्यात शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.

याचदरम्यान काल महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते अजित पवारांच्या या रॅलीत मोठी गर्दी होती. मात्र, अजित पवार यांची रॅली आणि एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ज्या मार्गावरून अजित पवारांची रॅली जात होती त्याच मार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक कार्यक्रम होता. त्यामुळे शिंदे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले होते.

महाविकास आघाडी आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येताच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू करताच शिंदे गट ही आक्रमक झाला. त्यांनी डीजेवर एकनाथ शिंदे यांच्या वरील अनाथांचा नात एकनाथ हे गाणं वाजवण्यास सुरुवात केली. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले होते.. कार्यकर्त्यांच्या या गोंधळामुळे वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती.

मात्र गोंधळाची ही परिस्थिती पाहून अजित पवार चांगलेच वैतागले. उघड्या जीपमधून खाली उतरत त्यांनी कार्यकर्त्यांना पुढे जाण्यास सांगितले. सर्व कार्यकर्ते पुढे गेल्यानंतर अजित पवार पुन्हा जीपमध्ये बसले आणि महाविकास आघाडीची ही रॅली पुढे गेली. परंतु, दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!