एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसींच्या दिल्लीतील घरावर दगडफेक…!


नवी दिल्ली : एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर दगडफेक झाली. ओवेसी यांनी पहाटे १ वाजता त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा व्हीडीओ ट्विट केला. ज्यात त्यांनी लिहिले आहे की माझ्या दिल्लीतील घरावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे.

२०१४ नंतरची ही चौथी घटना आहे. याआधी मी जयपूरहून परत आलो आणि माझ्या घरातील नोकराने मला सांगितले की झुंडीने दगडफेक केली, ज्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या. दिल्ली पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करावी. ही घटना चिंताजनक आहे. हाय सिक्युरिटी असलेल्या भागात ही घटना घडली आहे. याबाबत ओवेसी यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!