बारामती लोकसभा लढविण्याबाबत विजय शिवतरेंची भूमिका मवाळ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यशस्वी शिष्टाई..!


मुंबई : बारामतीमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु शिवतारे यांनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधत निवडणूक लढविनार असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यानंतर गुरुवारी तब्बल सात तास ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी ताटकळले होते. याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले असून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबणे ही बातमी नाही, माझी मुख्यमंत्र्यांसोबत दीड तास चर्चा झाली आहे.

या चर्चेनंतर मी दोन दिवस शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे, काय असेल ते पुढे पाहता येईल, असेही शिवतारेंनी म्हटले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवतारेंना २ दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय महायुतीत ज्याला उमेदवारी मिळते, त्याच्यासाठी काम करायचे, अशी समजही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बारामतीमधील नगरसेवक, पदाधिकारी, जिल्हाधिकारी, तालुकाप्रमुख यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीत मुख्यमंत्र्यांना मतदारसंघात असणारा त्रास त्यांना सांगितला. आता त्यांनी संबंधितांशी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!