Daund Crime : पती मोबाईलवर ‘तसले’ व्हिडिओ दाखवून तेच करायला लावायचा, पत्नीने वैतागून गाठले पोलीस स्टेशन, कौटुंबिक छळ प्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल, दौंडमध्ये धक्कादायक प्रकार..


Daund Crime : पती रोज रात्री घरी येऊन मोबाईलमध्ये अश्लिल पिक्चर दाखवायचा आणि अश्लिल पिक्चरमध्ये जसे करतात त्याप्रमाणे करायला भाग पाडत होता. तसेच दिर, जाऊ, नणंद मारहाण करत शारीरिक छळ करायची अशी तक्रार एका विवाहित महिलेने दौंड पोलीस ठाण्यात केली आहे.

याप्रकणी पतीसह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन २०१० ते १५ मे २०२२ रोजी पर्यंत घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकणी शशांक भोसले, प्रशांत भोसले, प्रियंका भोसले, निलम कांबळे (रा. पुणे), सिमा कांबळे (रा. पुणे), कविता कांबळे (रा. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पिडीत महिलेचा लग्न २ मे २०१० झाला होता. पती सतत दारूच्या नशेत असल्याने ते काही एक कामधंदा करीत नव्हते. तसेच मटका खेळण्याची सवय असल्यामुळे ते सतत मला माझे आई वडीलाकडुन पैसे आणण्यास तगादा लावत मारहाण करत होते. Daund Crime

दारूच्या नशेत रात्री अपरात्री घराबाहेर हाकलून देत होते, मुलबाळ होत नसल्यामुळे पती, जाऊ व नणंदा मारहाण करून मानसिक त्रास देत होते, तर पती रात्री घरी येऊन मोबाईलमध्ये अश्लिल पिक्चर दाखवायचा व अश्लिल पिक्चरमध्ये जसे करतात, त्याप्रमाणे करायला भाग पाडायचा, त्याचा मला मानसिक त्रास होत होता.

तसचे मला शारीरीक त्रास देऊन मारहाण करायचा व तसे न केल्यास जिवे मारण्याची धमकी द्यायचा अशी तक्रार पिडीत महिलेने दौंड पोलीस ठाण्यात दिल्याने दौंड पोलिसांनी याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!