उरुळी कांचन येथे महाराजा प्रतिष्ठानचा डिजे, बॅन्ड व वाद्यांना छेद ! भव्य रक्तदान शिबीराने शिवजयंती साजरी…!

उरुळी कांचन : डिजे , बँन्ड आणि वाद्यांनी अपारंपारीक उत्सव साजरा करण्याच्या कृतीला छेद देत उरुळी कांचन ( ता.हवेली ) येथील महाराजा प्रतिष्ठानने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रक्तदान शिबीराचे आयोजन करुन विधायक उपक्रमाने साजरी केली आहे. या रक्तदान शिबिरात ११८ जणांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने भाजप शहराध्यक्ष अमित सतिश कांचन व सहकाऱ्यांनी जिजाऊ सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ११८ नागरिकांनी रक्तदान केले. यामध्ये ३० महिलांचा समावेश होता. तर २२० नागरिकांनी अवयवदानासाठी नोंदणी केली आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते व महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष के डी बापू कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण काळभोर, भाजपा जिल्हा समन्वयक सुदर्शन चौधरी, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, पूनम चौधरी, उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, दत्तात्रय कांचन, अश्विनी कांचन, संचिता कांचन, सुप्रिया गोते, सीमा कांचन, भारतीय जनता पार्टी उरुळी कांचनचे विकास जगताप, आबा चव्हाण, पूजा सणस, रेखा तुपे, सारिका लोनारी, कविता खेड़ेकर, खुशाल कुंजीर, ऋषिकेश शेळके, आशुतोष तुपे, गणेश घाडगे, ऋषिकेश ढवळे, मानसी भुजबळ खुशी कुंजीर आरती मोडक साक्षी ढवळे आदी उपस्थित होते.
