Jayant Patil : निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार का? जयंत पाटलांनी सगळंच सांगितलं, म्हणाले आजच..


Jayant Patil : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

याच पार्शभूमीवर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. निलेश लंके हे आजचा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काल भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत.

ही यादी जाहीर होताच निलेश लंके यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. कारण निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. Jayant Patil

दरम्यान, याबाबत जयंत पाटील म्हणाले की, निलेश लंके शरद पवार यांना भेटण्यासाठी आज येत आहेत. निलेश लंके लोकांमधील नेते आहेत. ते पक्षात आले तर त्यांचे स्वागतच आहेत. ज्या आमदारांनी सह्या केल्यात त्यांना माहिती नाही कशावर सही केली, त्यापैकी निलेश लंके एक आहेत.

आमचे जागावाटप अजून झाले नाही पण निलेश लंके एक चांगला चेहरा आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. आता निलेश लंके यांनी जर शरद पवार गटात प्रवेश केला तर त्यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!