Vasant More : पुण्यात काय होणार? लोकसभा निवडणूक लढवणार का? वसंत मोरेंनी पहिल्यांदाच केले मोठे वक्तव्य…
Vasant More : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.
यंदाची निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून पुणे लोकसभेकडे राज्याच्या राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्याचे दौरे वाढवले आहेत. पुण्यात पदाधिकारी आणि नेत्यांच्या वरचेवर बैठका घेतल्या जात आहेत. मनसेमधील अंतर्गत वाद अनेकदा समोर आला आहे.
मात्र त्यातच आता मनसेचे फायरब्रॅंडनेते वसंत मोरे यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आज नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने वसंत मोरे नाशिकला गेले आहेत. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमापूर्वी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, पुणे लोकसभेकडून निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे. राज ठाकरेंनी मला ती संधी दिली तर शंभर टक्के मनसेचा पहिला खासदार होण्याची भूमिका बजावेन, असा दावा वसंत मोरेंनी केला आहे. नाशिकमध्ये मनसेने सत्तेचे तोरण बांधले होते.
आता लोकसभेच्या निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या मेळाव्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे, असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे जो निर्णय घेतील तोच निर्णय अंतिम राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. Vasant More
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात बोलताना साईनाथ बाबरांना मोठी संधी देण्याबद्दल सुतोवाच केले होते. यानंतर आता पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी सूचक व्हाट्सॲप स्टेट्स ठेवल्यानंतर पुन्हा एकदा मनसेच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. शर्मिला ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर काही तासांमध्येच त्यांनी स्टेट्स ठेवत राजकीय खळबळ उडवून दिली होती.
कुणासाठी कितीबी करा वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे, योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार. त्यामुळे वसंत मोरे यांनी नेमका कोणाला संदेश दिला आहे याची चर्चा रंगली. त्यानंतर थेट ते शरद पवारासोबत दिसले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र त्यानंतर आता त्यांनी थेट मी इच्छूक असल्याचे सांगून टाकले आहे.