Supriya Sule : टोकाचा विरोध आणि गळाभेट, बारामतीत नेमकं चाललंय काय? सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची भेट…

Supriya Sule : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी असणार आहे, अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
अशातच आता दोन्ही गटाकडून प्रचार, गाठी भेटीला सुरुवातही झाली आहे. जाहीर सभांमधून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात टोकाचा विरोध सुरू असल्याचे दिसत आहे.

तर दुसरीकडे काल खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची एका मंदिरात भेट झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सुळे आणि पवार यांनी गळाभेट घेतल्याचेही दिसत आहे यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, बारामती तालुक्यातील जळोची काळेश्वर मंदीरात दर्शनासाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकाचवेळी आल्या होत्या, त्यावेळी ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्यांदाच बारामती मतदार संघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे, यामुळे या लढतीची जोरदार चर्चा सुरू आहे. Supriya Sule
काही दिवसापूर्वी खासदार सुनिल तटकरे यांनीही बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार असतील असं सांगितलं होतं. बारामती लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.
कारण या मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका सुरू आहेत, सुनेत्रा पवार यांनीही बारामती लोकसभा मतदार संघात गाठीभेटी वाढवल्या आहेत.