Uruli Kanchan : ‘हर हर महादेवच्या घोषणांनी’ सोरतापेश्वरचरणी भाविकांची मांदियाळी! धार्मिक कार्यक्रमांनी श्रध्येचा आनंद फुलला…!!

Uruli Kanchan उरुळी कांचन : प्रति भिमाशंकर शिवलिंगाचे रुप असलेल्या सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील सोरतापेश्वराचे महाशिवरात्री निमीत्ताने १० हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती सोरतापेश्वर देवस्थान समितीचे विश्वस्त भाऊसाहेब पंढरीनाथ चौधरी यांनी दिली.

प्राचीन काळापासुन शिवलिंगाचे वास्तव असलेल्या सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील सोरतापेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत धार्मिक पध्दतीने साजरा परंपरा आहे. महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन ग्रामस्थांकडुन करण्यात येते. यंदा पहाटेपासूनच काकड आरती, सहस्त्रनाम , ग्रंथपारायण करुन सोहळ्यास सुरुवात झाली.
त्यानंतर नाम जप, हरिपाट असे कार्यक्रमात भाविकांनी सहभाग घेतला. सायंकाळी किर्तन, महाप्रसादाचे आयोजनांनी कार्यक्रमाला भव्यतेचे स्वरुप भाविकांनी उत्स्फूतपणे कार्यक्रमात सहभाग घेतला. भाविकांची दर्शनाची रिघ सकाळपासून सायंकाळ पर्यंत सुरू होती. Uruli Kanchan

देवस्थान समितीच्या वतीने येणाऱ्या भाविकांना फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच शुद्ध पाणी भाविकांना उपलब्ध करुन देण्यात आले होते. दिवसभर भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरात फुलून गेला होता.
