मी येथे काश्मिरींची मने जिंकण्यासाठी आलो; पंतप्रधान मोदी
श्रीनगर : भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच जम्मू-काश्मीर भेट आहे. मोदींनी काश्मीर येथील जनतेला संबोधित केले. ते म्हणाले की, मी या ठिकाणी तुमची मनं जिंकण्यासाठी आलो आहे. जोपर्यंत मी तुमची मनं जिंकत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करत राहीन. ही माझी गॅरंटी आहे.
जम्मू आणि काश्मीर आज मोकळा श्वास घेत आहे. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू मुक्त झाला आहे. अनेक दशके राजकीय फायद्यासाठी ३७० च्या नावाने जम्मू आणि काश्मीरच्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण, यापुढे जम्मू आणि काश्मीरमध्ये फक्त विकास होईल, असे मोदी म्हणाले आहे.
यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये विकास होत नव्हता. पण, आता विकासाला सुरुवात झाली आहे. काश्मीरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. उद्देश चांगला असेल तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. जम्मू-काश्मीरमध्ये जी-२० यशस्वीपणे पार पडले आहे.
गेल्या काही वर्षांपासून पर्यटनासाठी येणा-या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विदेशी पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये आल्याशिवाय राहत नाहीत. जम्मू-काश्मीरमधील केसर, सफरचंद यांना खूप महत्त्व आहे, असे मोदी म्हणाले आहे.