Lok Sabha Elections : ‘ते’ आठ मतदारसंघ आणि भाजप-शिंदे यांचा संघर्ष, निर्णय अमित शहांकडे, आज शेवटचा फैसला होणार..


Lok Sabha Elections : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही. त्याचं कारण म्हणजे राज्यातील काही मतदारसंघावरून भाजप-शिंदेसेनेत एकमत होय नसल्याचे चित्र आहे.

ज्यात आठ अशी प्रमुख मतदारसंघ आहेत, ज्यावरून भाजप-शिंदेसेनेत संघर्षाची ठिणगी पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. युतीत नेहमी शिवसेनेला मिळणाऱ्या अनेक लोकसभा जागांवर भाजपचा डोळा आहे. Lok Sabha Elections

त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाचे घोडे अडले असल्याची चर्चा आहे. अशात आज अमित शाह रात्री मुंबईत असणार असून, यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

या आठ मतदारसंघांवरून भाजप-शिंदेसेनेत संघर्षाची ठिणगी..

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ, कल्याण लोकसभा मतदारसंघ, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ, हिंगोली लोकसभा मतदारसंघ, रामटेक लोकसभा मतदारसंघ, रायगड लोकसभा मतदारसंघ, पालघर लोकसभा मतदारसंघ, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!