क्रिकेट खेळताना किरकोळ वाद, मुलावर शस्त्राने वार; गुन्हा दाखल..


पुणे : क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून मुलावर शस्त्राने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना खडकी परिसरातुन समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खडकी येथील दर्गा वसाहतमध्ये राहणारा १५ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. याप्रकरणी मोहम्मदचे वडील शाह आलम जुमान शाह (वय ४२) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एका मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा रविवारी खडकी बाजार परिसरातील मैदानात रविवारी दुपारी क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. क्रिकेट खेळताना त्याचा आरोपी मुलाशी वाद झाला होता. आरोपी मुलाने त्याच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केले आणि आरोपी तेथून पसार झाला होता.

दरम्यान, एका मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!