Harshvardhan Patil : मोठी बातमी! इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचा ‘तो’ पदाधिकारी अडकणार? हर्षवर्धन पाटील यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र…


Harshvardhan Patil इंदापूर : इंदापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी खालच्या भाषेत जाऊन शिवीगाळ करत असल्याचे दिसून आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भाजप नेते आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना शिवीगाळ करत असल्याची व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये ते म्हणाले, इंदापूरमध्ये मित्र पक्षाचे काही पदाधिकारी जाहीर मेळावे आणि सभांमधून माझेवरती अतिशय खालच्या पातळीवर एकेरी व शिवराळ भाषेत बेताल भाषेत वक्तव्य करत आहेत.  Harshvardhan Patil

तसेच तालुक्यात फिरू न देण्याची भाषा करत आहेत. यामुळे मला माझ्या सुरक्षेची चिंता वाटत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. याबाबत आपण ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी, अशी मागणी या पत्रामधून केली आहे.

यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल. दरम्यान, यामुळे इंदापूरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक आक्रमक झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!