Pune Crime : लग्नाच्या आमिषाने दुसऱ्यांदा गर्भवती करून खुनाची धमकी, लाेणीकंद पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेडया..
Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून एका तीसवर्षीय महिलेशी शारीरिक संबंध ठेवत तिला मूल झाले. त्यानंतर तिला पुन्हा गर्भवती करून दुसऱ्या तरुणीशी लग्नाचा घाट घालणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
ऋषिकेश एकनाथ कुबेर (वय २५, रा. वाघोली) या तरुणास लाेणीकंद पाेलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार,फिर्यादी व आरोपी यांची ओळख होती. आरोपीने फिर्यादींना लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातून त्यांना दीड वर्षापूर्वी मुलगी झाली. त्यानंतरही तरुणाने महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याने पुन्हा ती महिला गर्भवती राहिली. Pune Crime
दरम्यान, ऋषिकेश याने संबंधित महिलेला साेडून दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा घाट घातला. त्याला विराेध दर्शवताच महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून लग्नाला विराेध केल्याने, तुला आणि तुझ्या मुलीला जिवे मारीन, अशी धमकी दिली.
त्यामुळे शेवटी फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी ॲट्राॅसिटीखाली गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील तपास करीत आहेत.