Crime News : भारतात फिरायला आलेल्या विदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार, घटनेने उडाली खळबळ..
Crime News : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
परदेशातून भारतात फिरायला आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला आपल्या पतीसोबत झारखंड येथील दुमका येथे आली होती. तेथे आठ ते दहा जणांनी तिच्यावर अत्याचार केला. पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हंसडीहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुरुमाहाट येथे ही धक्कादायक घटना घडली. स्पेनमधील महिला या ठिकाणी फिरायला आली होती. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. महिलेसोबत तिचा पतीही होता. Crime News
स्पेनमधून पती-पत्नी टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. ते आधी स्पेनमधून पाकिस्तानला गेले होते. तिथून ते बांगलादेश आणि त्यानंतर तिथून भारतातील झारखंडच्या दुमका येथे आले होते.
दुमकाच्या हंसडीहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंजी गावात ते टेंटमध्ये थांबले होते. झारखंडमधून ते दोघे नेपाळला जाणार होते. त्याआधीच आठ ते दहा जण तिथे आले. त्यांनी महिलेवर अत्याचार केले.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि माहिती घेतली. पीडितेच्या तक्रारीवर घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. पीडितेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.