Eknath Shinde MLA Fight : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार एकमेकांसमोर भिडले! विधानभवनात मोठा राडा, नेमकं घडलं काय?


Eknath Shinde MLA Fight : ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील नेत्यांमधील धुसफूस समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

नेमकं घडले काय?

अर्थसंकल्पीय अधिवेशानाचा आज अखेरचा दिवस आहे. पण याच दिवशी सत्ताधारी आमदारांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे, दरम्यान शिंदे गटाच्या आमदारांनी याला पुरावा काय असा प्रति प्रश्न केला परंतु तोपर्यंत महेंद्र थोरवे यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना दादा भुसे हे मग्रूर असल्याचा आरोप केला.

ही धक्काबुक्की थांबवण्यासाठी अखेर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागल्याची चर्चा सध्या विधिमंडळाच्या परिसरात जोरात सुरू आहे. दरम्यान या प्रकरणावरून विरोधकांनी मात्र शिंदे गटातील आमदारांना चांगलाच टोला मारला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यांचे संस्कार शिका, असे असतात संस्कार अशा शब्दात टोला मारला. Eknath Shinde MLA Fight

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहिती विधिमंडळ परिसरात झाल्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले. दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचे देखील सांगितले जात होते. दरम्यान महेंद्र थोरवे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना मी दादा भुसे यांच्या घरचे खात नाही.

आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी प्रामाणिक आहोत. खासदार श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतदारसंघातील कामे करण्यासाठी दादा भुसे यांना सूचना केली होती, मात्र त्यांनी ते ऐकले नाही. मी विचारणा करण्यास गेलो असता, त्यांनी उद्धटपणे उत्तरे दिली. त्यामुळे आपण थोडेसे रिऍक्ट झालो. असे त्यांनी सांगितले आहे. Eknath Shinde MLA Fight

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!