तरुणीचा घरापर्यंत पाठलाग करुन विनयभंग; हडपसर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या..


पुणे : तरुणीचा घरापर्यंत पाठलाग करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून पुन्हा विनयभंग केल्याची घटना हडपसर येथून समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

हडपसर येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी वेदांत उद्धव झुंजुर (वय-२३ रा. तुकाईदर्शन, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने यापूर्वी पीडित तरुणीचा पाठलाग करुन विनयभंग केला होता. याप्रकरणी मुलीने फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्याच्यामध्ये कोणताही फरक पडला नाही. त्याने वेळोवेळी फिर्यादी व तिच्या वडिलांना फोन केले. बुधवारी (दि.२८) रात्री नऊच्या सुमारास सुमारास फिर्यादी घरी जात असताना आरोपीने तिचा चोरून पाठलाग केला होता.

तरुणी तिच्या राहत्या बिल्डींगजवळ आल्या असता आरोपी तिच्या पाठिमागे आला होता.यावेळी फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीला याचा जाब विचारला. त्यावेळी त्याने तुमची मुलगी मला खुप आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. असे म्हणून मुलीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला.

दरम्यान, मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अब्दागिरे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!