दाजीचा मेव्हणीवर डोळा! अश्लील चाळे करणाऱ्या रंगेल दाजीवर मेव्हणीने केला गुन्हा दाखल..!!
पुणे : पुण्यातील बलात्कार, विनयभंग, खून असे प्रकार वारंवार घडतांना दिसून येत आहे. असाच एक प्रकार साली आधी घरवाली होती है’ असे म्हणत एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वडगाव बुद्रुक येथून समोर आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
१४ वर्षीय पीडित मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बुधवारी (ता .२८) फिर्याद दिली आहे. यावरुन पीडित मुलीचा दाजी सुरेश शामलाल यादव (वय-२६ रा. चरवडवस्ती, वडगाव बु., पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १४ वर्षीय मुलगी आरोपीच्या घरी असताना तिच्या बहिणीच्या पतीने वेळोवेळी तिच्यासोबत अश्लील चाळे करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला आहे.
आरोपीने पीडित मुलीसोबत गैरवर्तन केले असता. त्यामुळे मुलीने पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी आरोपीने तिला मारहाण करुन कोणाला काही सांगितले तर तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार नाही असे सांगितले.
दरम्यान, तसेच तुझे आई-वडील व मोठी बहिण गावाला गेल्यानंतर बघून घेतो अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मालुसरे करीत आहेत.