Pradeep Kand : प्रदीप कंद यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, शिरूरमधील कामांबाबत दिले निवेदन…

Pradeep Kand : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिरुर- हवेली मतदारसंघातील जनतेच्या महत्त्वाच्या विषयासंदर्भात संवाद साधला आणि आभार मानले.

यावेळी शिरूर तालुक्यातील चासकमान प्रकल्पाच्या अस्तरीकरणासाठी १९५७ कोटी मंजूर निधीस प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. डिंभे उजवा तीर कालव्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित झाल्या आहेत त्यांना लवकरात लवकर मोबदला मिळण्याबाबत देखील मागणी केली. Pradeep Kand
तसेच शिरूर तालुक्यातील निमोणे पॉवर हाऊस साठी ११kV चे ८१ ट्रान्सफॉर्मर मिळण्याबाबत मागणी त्यांनी केली आहे. या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करून ते मार्गी लावावेत अशी विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत आढावा घेतला.

दरम्यान, ही भेट येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची भेट मानली जात आहे. याबाबत येणाऱ्या काळात त्यांना राजकीय बढती मिळणार का.? ही यानिमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.
