Gautami Patil : गौतमी पाटीलचं खरं नाव आहे वेगळंच, वाचून वाटेल आश्चर्य, जाणून घ्या….

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम म्हटलं तर चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते. ज्या गावामध्ये गौतमीचा कार्यक्रम होतो त्या गावाच्या आसपासच्या गावातील नागरिक तिची झलक आणि डान्स पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात. सबसे कातिल गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आहे.

लावणी डान्सर गौतमी पाटीलचे राज्यभरात ठिकठिकाणी डान्सचे कार्यक्रम होतात. अशामध्ये नुकताच गौतमी पाटीलचा पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी गौतमीच्या एका चाहतीने तिची भेट घेतली. गौतमीने यावेळी सर्वांना तिचे खरं नाव नेमकं काय आहे हे सांगितले. Gautami Patil
गौतमी पाटीलच्या आडनावावरुन अनेक वेळा वाद झाला आहे. अशात आता गौतमी पाटीलचे खरं नाव देखील वेगळं असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: गौतमीनेच तिचे खरं नाव वेगळं असल्याचे सांगत खऱ्या नावाची ओळख करून दिली आहे. गौतमीने तिचे जन्मनाव हे वैष्णवी असल्याचे सांगितले आहे. आडनावानंतर आता गौतमी पाटीलचे खरं नाव देखील वेगळं असल्याचे समोर आले आहे.

नेमकं घडले काय?
जुन्नर तालुक्यातील केवाडी येथे आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गौतमी पाटीलने हजेरी लावली.

या कार्यक्रमावेळी गौतमीसारखी दिसणारी एक मुलगी गौतमी पाटीलला प्रत्यक्षात भेटण्यासाठी तिची वाट पाहत होती. या कार्यक्रमाच्या शेवटी तिची आणि गौतमी पाटीलची भेट झाली.
यावेळी एका व्यक्तीने या मुलीची ओळख गौतमी पाटीलला करून दिली. ही मुलगी गौतमीसारखी दिसत असल्यामुळे तिला शाळेमध्ये सर्वजण गौतमी म्हणून चिडवतात. यावेळी गौतमी पाटीलला ही मुलगी तिचे नाव सांगते.
ही मुलगी लाजत तिचे नाव वैष्णवी असल्याचे सांगितले. त्यावेळी तिचे नाव ऐकून गौतमी पाटील सांगते की, ‘माझं पण जन्मनाव सुद्धा वैष्णवी आहे.’ असे सांगत गौतमी पाटील यावेळी तिचं खरं नाव नेमकं काय आहे हे चाहत्यांना सांगते. सध्या गौतमी पाटीलचा हा व्हिडीओ सोशल मीडिायावर व्हायरल होत आहे.