Yashwant Sahakari Sakhar Karkhana : हवेलीत ‘यशवंत’च्या निवडणूकीसाठी २१ जागांसाठी ३२० उमेदवारी अर्ज! निवडणूक बिनविरोध प्रयत्नांना मोठा ब्रेक…!!


Yashwant Sahakari Sakhar Karkhana उरुळीकांचन : संचालक मंडळाचा अनागोंदी कारभार व राजकीय वक्रदृष्टीचा शिकार ठरलेला सहकारातील अस्तित्वाच्या घटका मोजत असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंधरा वर्षानंतर होऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी हवेली व दौंड तालुका कार्यक्षेत्रातून २१ जागांसाठी ३२० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे गत संचालक मंडळात कलम ८८ कारवाईत दोषी ठरलेल्या कारखान्याचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक मंडळातील इच्छुकांचा सामावेश आहे.

सन २०१०-११ च्या गळीत हंगामात तत्कालीन संचालक मंडळाला बरखास्त करुन झालेल्या कारवाईनंतर तब्बल १३ वर्षे बंद अवस्थेत असलेल्या यशवंत कारखान्याच्या निवडणूकीला मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेमुळे निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे.२४८ एकर स्वमालकीची जमीन असलेल्या या कारखान्याला १३ वर्षापासून सुरू करण्याचे प्रशासकीय पातळीवर झालेले प्रयत्न असफल ठरल्यानंतर प्रथमच लोकनियुक्त संचालक मंडळाची कारखान्यावर चालू निवडणूकीने वर्णी लागणार असल्याने कारखान्याचे भवितव्य ही निवडणूक व पुढील संचालक मंडळ ठरविणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची ठरत आहे.

हवेली व दौंड तालुका कार्यक्षेत्र मिळून १०४ गावांचा सामावेश कारखाना कार्यक्षेत्रात आहे. जवळपास ७ लाख मेट्रिक टन ऊस उल्पब्धता कार्यक्षेत्रात असून कारखाना कार्यक्षेत्रात वाढत असलेले शहरीकरण ऊसाची उपलब्धता घटविण्यासाठी आगामी काळात कारणीभूत ठरणार आहे. परंतु ऊस उपलब्धता असलेल्या पूर्व पट्यात कारखाना बंद अवस्थेत असल्याने ऊस उत्पादनाचा मोठा परिणाम झालेल्या या भागात संचालक मंडळा ची निवडणूक म्हणून सभासदांच्या आशेचा किरण ठरत आहे. Yashwant Sahakari Sakhar Karkhana

गेल्या १३ वर्षात संस्था बंद असल्याने कारखान्याकडे शिल्लक भागभांडवल उपलब्ध नसल्याने सभासदांनी न्यायालयात याचिका दाखल करुन संस्थेची निवडणूक होऊ घातली आहे. विविध वित्तीय संख्यांचे दिडशे कोटींचा कर्जाचा बोजा, सभासद व कामगार थकीत देणी , यांत्रिक दुरुस्ती व बंद असलेला ताळेबंद या अर्थिक चक्रातून संस्थेची निवडणूक होत आहे.

या निवडणूक संचालक मंडळाची संख्या तीन जागांनी कमी झाली आहे. या निवडणुकीत ऊस उत्पादक गटानुसार उरुळीकांचन ३ जागा, सोरतापवाडी ३ जागा, लोणीकाळभोर ३ जागा, फुरसुंगी -मांजरी बुद्रुक २, लोहगाव २ जागा , वाडेबोल्हाई २ जागा अशा उत्पादक जागा आहेत. तर महिला प्रतिनिधी २ जागा, मागासवर्गीय १ जागा, भटक्या जाती /जमाती १ जागा, अणुसुचित जाती १ जागा, पणन संस्था १ जागा अशा २१ जागा असणार आहेत. तर २१, ०१९ इतकी सभासद संख्या मतदानाची असणार आहे.

अर्ज दाखल केलेले प्रमुख उमेदवार…

कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के .डी .कांचन, माजी उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी संचालक पांडुरंग काळे, रामदास चौधरी, महादेव कांचन, राजीव घुले , कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे, सुभाष जगताप, अजिंक्य कांचन , अनिल टिळेकर आदी प्रमुख उमेदवारांचा सामावेश आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!