Pune News : काय सांगता! ऑनलाइन टास्कमध्ये १७ लाख घालवून कमवले १५० रुपये, पुण्यातील तरुणाचा प्रताप…

Pune News : सध्या जास्त पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सामान्यांची फसणवूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. ऑनलाइन टास्कच्या आमिषाने हडपसर भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी साडेसतरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
याबाबत सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. त्याला ऑनलाइन काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे सांगितले होते.
याबाबत या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे शहरातील उपहारगृहांची माहिती देणारा मजकूर समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात येणार असून, त्याला ऑनलाइन पद्धतीने दर्शक पसंती मिळवून देण्याचे हे काम असल्याचे त्याला सांगितले. तरुणही याला तयार झाला. Pune News
चांगले पैसे मिळतील असे सांगून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी त्याला काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी त्याला लगेच १५० रुपये ऑनलाइन पद्धतीने दिले. यामुळे तो देखील खुश झाला पैसे मिळत आहेत असे त्याला वाटले.
यामुळे तरुणाचा विश्वास बसला. चोरट्यांनी पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला. ऑनलाइन टास्कमध्ये पैसे गुंतविल्यास चांगले पैसे परताव्यापोटी मिळतील, असे सांगितले. चोरट्यांनी वेळोवेळी त्याच्याकडून ऑनलाइन पद्धतीने १७ लाख ७० हजार ३२६ रुपये घेतले. नंतर मात्र त्याच्याशी संपर्क केला नाही.
नंतर मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक भोसले तपास करत आहेत. या घटनेमुळे त्याच्या कुटूंबाला एकच धक्का बसला आहे.