Pune News : लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार, विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…


Pune News  पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत लग्न करतो असे आमिष दाखवून ३२ वर्षीय अभिनेत्रीसोबत वारंवार लैगिंक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकणी पुण्यात राहणाऱ्या ३२ वर्षीय अभिनेत्रीने विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  विराज रविकांत पाटील (वय ३५, रा. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिला अभिनेत्री असून पतीपासून विभक्त राहते. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ती राहण्यासाठी आहे. तिची आणि आरोपीची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपीचेही लग्न झाले आहे. Pune News

मात्र पत्नीपासून घटस्फोट घेणार असून तुझ्यासोबत लग्न करतो असे आमिष त्याने फिर्यदीला दाखवले. तिच्यासोबत नैसर्गिक आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर काही काळाने आरोपीने फिर्यादीचा फोन घेण्याचे टाळले. त्यावर फिर्यादीने मला का टाळतोस, घरच्यांना का भेटवत नाहीस असे विचारले.

त्यावर आरोपीने फिर्यदिला शिवीगाळ करत डोक्यावर पिस्तल ठेवली अन् मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, पोलिसांकडे गेलीस तर तुला दाखवतो, मी कोण आहे ते, असे म्हणत धक्काबुक्की केली. या सर्व घटनेनंतर फिर्यादी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!