Pune News : पाण्याच्या टाकीवर चढून तरुणाने मारली उडी अन्…, उडाली खळबळ

Pune News : पुणे जिल्ह्यातील आंबेठाण (ता.खेड) गावातील मराठी शाळेजवळील पाण्याच्या टाकीवर मनोरुग्ण तरुणाने थेट उडी घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुण हा गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
विजय गुळवे (वय.२४ वर्षे ) असे या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, विनोद विजय गुळवे हा तरुण सलग दोन दिवस याच पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पहिल्या दिवशी रेशक्यू टीमने व महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी सीताफिने खाली उतरवले होते.


पण त्याने शुक्रवारी (ता.२६) रोजी हा तरुण सकाळी ११ वाजल्यापासून टाकीवर चढून उडी मारण्याची भीती दाखवत होता. त्याला वाचविण्यासाठी त्याचे कुटुंब, पोलीस प्रशासन, रेशक्यू टीम व स्थानिक ग्रामस्थ विनवण्या करत होते. पण तो कोणत्याही विनवणीला दाद द्यायला तयार नव्हता. Pune News
दरम्यान, शेवटी पोलीस व रेशक्यू टीमने पाण्याच्या टाकीला जाळी लावून त्याला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण त्याने एका रेस्क्यू टीमच्या ताब्यातून सुटून थेट टाकीवरून खाली उडी घेतली. त्यावेळी उपस्थित नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. जखमी तरुणांस उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.