Pune News : पुणे हादरलं! आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाकडून तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार..

Pune News : वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाने संस्थेतील ३ विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे याप्रकरणी आळंदी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

दासोपंत उंडाळकर (वय.५२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेतील तिन्ही पीडित मुले अल्पवयीन आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केले जात होते. गेल्या १५ दिवसांपासून मुलांवर आरोपी अनैसर्गिक अत्याचार करत होता. आळंदीत वारकरी शिक्षण देणारी संस्था चालवणारा दासोपंत उंडाळकर हा संस्थाचालक कमी आणि शिक्षक म्हणूनच जास्त वावरायचा. Pune News

दासोपंतने आपल्याच विद्यार्थ्यांना वासनेचे शिकार बनवले. दासोपंत ज्या संस्थेचा संस्थाचालक आहे. तिथे ७० मुले वारकरी शिक्षण घेत असल्याचं पोलिसांनी सांगितले. दासोपंतकडे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 3 अल्पवयीन मुलांना दासोपंत एकांकात बोलवायचा. गेल्या १५ दिवसांपासून दासोपंत या 3 अल्पवयीन मुलांना एकांतात बोलावून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचा.

या सर्व धक्कादाय प्रकाराबद्दल पीडित मुलांनीच पहिल्यांदा खुलासा केल्याने दासोपंतचा भांडाफोड झाला. मुलांनी त्यांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात हिंमत दाखवून वाच्यता केल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.