Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आझाद मैदानात परवानगी नाकारली…

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी नाकारण्यात आली आहे. खेळासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानात उपोषण करण्याची परवानगी नाही, असं उत्तर आझाद मैदान पोलिसांनी आयोजकांना दिलं आहे.

पोलिसांनी आयोजकांना दिलेल्या पत्रात म्हटलंय की, खेळासाठी राखीव असलेल्या मैदानात उपोषणाला परावानगी नाही. शिवाय आझाद मैदानाची इतकी क्षमता नाही की, इथे मोठे आंदोलन होऊ शकेल. त्यामुळे जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशल कॉर्पोरेशन पार्क मैदान येथे आंदोलन करावं. दुसरीकडे, आझाद मैदानावर मराठा आयोजकांकडून तयारी सुरु झाली आहे.
मुंबईकर, आमचे हाल होऊ नयेत असं वाटत असेल तर सरकारनं तोडगा काढवा. आम्ही पण ऊन, वाऱ्यात आहोत, आमचेपण हाल सुरु आहेत. सरकारचं शिष्टमंडळ नाही, काही अधिकारी भेटायला आले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेटायला यावं. तेच तेच मुद्दे सांगितले जात आहेत. आम्हाला विजयाचा गुलाल उधाळायचा आहे, असं जरांगे पाटील म्हणाले. Manoj Jarange Patil

आझाद मैदानात तयारी झाली आहे. स्टेज तयार झालं आहे. आम्हाला सरकारला सहकार्य करायचं आहे. त्यामुळेच आम्ही लोणावळ्यात थांबलो आहे. काही मंत्री आणि सचिव चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळ जिथे म्हणेल, तिथं चर्चा करु. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढवा. मुंबईला आम्हाला येण्याची हौस नाही, असं जरांगे पाटील म्हणाले आहे.