Purv Haveli : पूर्व हवेली तालुक्यात रंगला प्रभू श्रीरामांचा आगमन सोहळा, राम राज्य अवतरल्याची मिळाली अद्भूती..!


Purv Haveli उरुळी कांचन : पूर्व हवेली तालुक्यात श्री रामलल्लांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत अभूतपूर्व पध्दतीने पारंपरीक सणासुदीच्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. या संपूर्ण सोहळ्याने राम राज्य अवतरले अशी अद्भूती पहायला मिळाली. नागरीकांनी कौंटुंबिक पध्दतीने, ग्रामदेवतेच्या मंदिरात, घरांवर वारकरी सांप्रदयाचे भगवे ध्वज उभारीत पूजा अर्जा, होम हवन, अभिषेक ,राम स्त्रोत व हनुमान चालीसा पठणाने प्रभूंचा आगमनाचा सोहळा उत्साहात संपन्न केला.

उरुळी कांचन येथील श्री राम मंदिरात मागील सात दिवसांपासून राम कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ह.भ.प. चिंतामणी तारू महाराज यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. ठिक साडे बारा वाजण्याच्या सुमारास पुष्पवृष्टी करण्यात आली. भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. Purv Haveli

सोरतापवाडीत हणुमान मंदिरात किर्तन, भजन यांचा अनुप उत्साहात ग्रामस्थ सहभागी झाले होते. रामलल्लांची नगर प्रर्दशिना घालून प्राणप्रतिष्ठाना झाल्यानंतर राम सुर्यवंशी यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

थेऊर येथील चिंतामणी मंदिरात डॉ. नीलिमा देशपांडे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच श्रीरामचंद्राच्या मूतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण एलईडी स्क्रीन वर करण्यात आले. या सोहळ्यानिमित्त स्वच्छता मोहीम, अभिषेक, कीर्तन, मिरवणूक, महाआरती, महाप्रसाद, दीपोत्सव, व संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा या निमित्ताने ग्रामपंचायत परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित असलेल्या नागरिकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

लोणीकंद येथे श्रीराम मंदिरात जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद व त्यांच्या पत्नी पुजा कंद यांच्या हस्ते होमहवन, आरती करण्यात आली. रामरक्षा स्त्रोत, भजन आदी कार्यक्रमात ग्रामस्थांची मोठी हजेरी होती. तसेच पूर्व हवेली इतर गावांत मोठ्या संख्येने धार्मिक कार्यक्रमात ग्रामस्थ सहभागी झाल्याचे चित्र दिसत होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!