Pune Crime : रक्षकच बनला भक्षक! पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Pune Crime पुणे : रक्षकच भक्षक बनल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामतीत यापूर्वी कार्यरत असणाऱ्या आणि सध्या पुणे मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने एका तरुणीवर बलात्कार करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी दशरथ नामदेव कोळेकर (वय.४० रा. एमआयडीसी, बारामती) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकणी २० वर्षीय तरुणीने पुण्यात फिर्याद दिली असून येथून हा गुन्हा बारामती शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादी नुसार, बारामती शहरातील अशोकनगर भागात ही तरुणी राहत होती. कोळेकर याने तिला केलेल्या मदतीच्या मोबदल्यात तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तिला मारहाण केली. तिच्या परिस्थितीचा फायदा घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. Pune Crime


आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलगी बारामती येथून पुण्यात निघून आली. यानंतर आरोपी कोळेकर याने तिच्या बहिणीला फोन व मेसज करुन आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, दशरथ कोळेकर याच्याविरुद्ध दाखल गुन्हा आंबेगाव पठार येथून बारामती शहर पोलीस ठाण्यात वर्ग झाला आहे. तपास सुरु असून अद्याप या प्रकरणी कोळेकर याला अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली आहे.