पुणे जिल्ह्यातील मोटार सायकल चोरणारी टोळी अखेर जेलबंद! यवत पोलिसांची कामगिरी…

पुणे : पुणे जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाईक चोरी करणारी टोळी पुण्यात सक्रिय होती. या टोळीच्या मुसक्या अखेर आवळण्यात आल्या आहेत.
यवत, दौंड, लोणी काळभोर, हडपसर, बारामती या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरी करण्याच्या सराईत आरोपींना यवत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहे. याबाबत माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली आहे.
कृष्णा रामभाऊ लोंढे (वय २३) राहुल उर्फ कोयत्या हिंम्मत पवार (वय २१), यश उर्फ पंडित ज्ञानेश्वर थोरात (सर्व रा. नानगाव, ता. दौंड, जि.पुणे ) अशी ताब्यात घेतलेल्या मोटार सायकल चोरीतील आरोपींचे नावे आहे. यापैकी दोघांना सोमवारी (ता.१५) यवत गुन्हे शोध पथकाने तालुक्यातील येथून जेरबंद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनीसार, पाटस परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले आहे. त्यानुसार या मोटारसायकल चोरीतील आरोपींच्या मार्गावर पोलीस होते. सदरचा गुन्हा कृष्णा रामभाऊ लोंढे व त्याचे इतर दोन साथीदार यांनी केल्याच्या तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींची गुप्त माहिती मिळाल्याने कृष्णा रामभाऊ लोंढे व राहुल उर्फ कोयत्या हिंम्मत या दोघांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या आरोपींनी यवत, दौंड, लोणी काळभोर, हडपसर, बारामती शहर इत्यादी पोलीस स्टेशन हद्दीतून १० मोटार सायकली चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींकडून ९ मोटार सायकली असा ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.