Sangli News : प्रेम प्रकरणामुळे नाहक शिक्षा! मुलीच्या कुटूंबियांकडून मुलाच्या वडिलांना विजेच्या खांबाला बांधून मारहाण, वडिलांचा मृत्यू..


Sangli News : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मुलीला प्रेमप्रकरणातून पळवून न्हेल्याच्या रागातून मुलांच्या वडिलांना विजेच्या खांबाला बांधून घालून केलेल्या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे येथील धनटेक परिसरात घडली आहे.

दादासाहेब रामचंद्र चौगुले ( वय. ५५ , रा.मांगले) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तर चार जणांना अटक देखील करण्यात आली आहे.

चौगुले यांच्या मुलाचे एका मुलीवर प्रेम होते त्यानंतर त्या मुलाने मुलीला पळवून नेले. यानंतर मुलीला पळवून नेल्याचा राग तिच्या कुटुंबीयांना अनावर झाला. Sangli News

मुलीचे कुटुंब चांगलेच संतापले आणि त्यांनी मुलाच्या वडिलांना म्हणजे दादासाहेब रामचंद्र चौगुले यानायांना खांबाला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे ते दोघे कुठे आहेत ते सांगा असे म्हणत जोरदार मारहाण करण्यात आली यानंतर दादासाहेब चौगुले बेशुद्ध पडले आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर चार जणांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!