आंध्रप्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी शर्मिला यांची निवड, जगमोहन रेड्डींना धक्का देण्याची तयारी..!!


नवी दिल्ली : आंधप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदी म्हणून शर्मिला यांची  निवड करण्यात आली आहे. काँग्रेसने एका निवेदनातून त्यांची निवड जाहीर केली आहे. आंधप्रदेशचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रुद्र राजू यांची काँग्रेस कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित म्हणून निवड करण्यात आली आहे.

आंध प्रदेशाचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला यांनी ४ जानेवारीला काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून चर्चा सुरू होती , पार्टीकडून  यांना मोठी जवाबदारी देण्यात येईल अशी चर्चा होती . तेलंगणातील विधानसभा शर्मिला यांनी निवणुकीपूर्वी ३० नोव्हेंबरच्या  तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठींबा जाहीर केला होता.

दरम्यान, वायएसआर तेलंगणा काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस देशातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्षा पक्ष आहे कारण तो सर्व समुदायांची सेवा करतो आणि सर्व वर्गांना एकत्र करतो, असे त्यांनी नमूद केले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!